पॅकेज घोषणेप्रकरणी मुख्यमंत्र्यांना क्लीन चिट

October 12, 2015 7:14 PM0 commentsViews:

cmiaf12 ऑक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका विकास परिषदेमध्ये 6500 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. या घोषणेमुळे त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे दाखल केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आचारसंहिता भंग केली नाही अशी क्लीन चिट निवडणूक आयोगांनी दिलीये.

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका विकास परिषदेत तब्बल 6500 कोटींचं पॅकेज जाहीर केलं.

मुख्यमंत्र्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पॅकेज जाहीर केल्यामुळे काँग्रेस आणि मनसेनं सडकून टीका केली. काँग्रेसने मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती.

याबद्दल निवडणूक आयोगाने निवडणूक अधिकार्‍याकडून अहवाल मागवला होता याविषयी निवडणूक अधिकार्‍याने आयोगाकडे अहवाल पाठवला आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचा कोणताही भंग केलेला नाही असा खुलासा करण्यात आला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close