रॅगिंगला कंटाळून पुण्यात विद्यार्थ्याची आत्महत्या

January 27, 2010 10:58 AM0 commentsViews: 3

27 जानेवारी सीनिअर विद्यार्थ्यांच्या रॅगिंगला कंटाळून पुण्याच्या डीईएस लॉ कॉलेजच्या दुसर्‍या वर्षात शिकणार्‍या प्रशांत चितळकर विद्यार्थ्याने आत्महत्या केली. प्रशांतने सोमवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रॅगिंगच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळूनच प्रशांतने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी डीईएस लॉ कॉलेजमधल्या 9 विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांतने या आधीही पंधरा दिवसांपूर्वी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.मात्र, त्यातून तो वाचला होता. प्रशांतचं कॉलेजमध्ये येणं अनियमीत होतं. रॅगिंगच्या त्रासासंबधी त्याने कुठलीही तक्रार केली नव्हती, असं डीईएस लॉ कॉलेजच्या प्रिन्सिपल रोहिणी होनप यांनी सांगितलं. तसेच या आत्महत्ये मागची कारण शोधण्यासाठी डीईएस लॉ कॉलेजने तीन सदस्यांची एक समिती नियुक्ती केली आहे.

close