शिवरायांच्या चौदाव्या वंशज

October 12, 2015 9:53 PM0 commentsViews:

12 ऑक्टोबर :  शिवरायांच्या चौदाव्या वंशज नयनताराराजे यांच्या हस्ते प्रतापगडावरील भवानी मातेची पुजा करण्यात आली. छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज छत्रपती उदनयराजे भोसले यांची नयनतारा राजे ही धाकटी मुलगी आहे. या वेळी भवानी मातेचा देवीची पुजाही त्यांच्याच हस्ते करण्यात आली. nayan tara

या मेघडंबरीवरची कला-कुसर अप्रतिम करण्यात आली आहे. ही मेघडंबरी बनवण्यासाठी पुण्यातील दिग्गज कलाकारांना गडावर आणण्यात आले होते. ज्या डिझाईन आवडल्या नाहीत, त्या पुन्हा वितळवून बनवण्यात आल्या आहेत. छत्रपती उदयनराजे भोसले यांना आठ वर्षांचा विरप्रतापसिंह राजे आणि पाच वर्षांची नयनताराराजे अशी दोन मुलं आहेत. ही मुलं बाहेरगावी असल्यामुळे ती कुणाच्याच समोर आली नव्हती. मात्र भवानी मातेचा पुजेसाठी नयनताराराजे आल्या होत्या.

पुजन झाल्यानंतर त्यांना तलवारी दानपट्टा मशालीच प्रात्याक्षिक दाखवण्यात आली. यावेळी नयनतारा राजे यांनीही आपल्या लहानग्या हातात तलवार घेवून ती उंचावत लोकांची मने जिंकली. उदयनराजेंची धाकटी कन्या नयनताराराजे भोसले आतापर्यंत सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्या नव्हत्या. मात्र, या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या आज सर्वांसमोर आल्या.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close