महाराष्ट्राची बदनामी मुख्यमंत्र्यांच्या पाकधार्जिण्या कृतीमुळे,राऊतांचा पलटवार

October 13, 2015 1:52 PM0 commentsViews:

raut on fadanvis13 ऑक्टोबर : महाराष्ट्राची बदनामी शिवसेनेमुळे नाहीतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाकधार्जिण्या कृतीमुळे झालीय असा पलटवार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय.

सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई हल्ल्यामुळे सेना भाजपात सुरू झालेला ‘सामना’ काही केल्या थांबत नाहीये. सुधींद्र कुलकणीर्ंना काळ फासल्याबद्दल काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दुषणंं दिली होती. शिवसेनेच्या याकृत्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली, अशी शेलकी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याला आज शिवसेना खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्राची बदनामी शिवसेनेमुळे नाहीतर मुख्यमंत्र्यांच्या पाकधार्जिण्या कृतीमुळे झालीये अशी सणसणीत टीका राऊत यांनी केली. तसंच मुख्यमंत्र्यांना अजून महाराष्ट्र कळलाच नाही. असा टोलाही लगावण्यात आलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close