पिंपरी-चिंचवड मेट्रो प्रकल्प एका खासदारामुळे रखडला, अजित पवारांचा गौप्यस्फोट

October 13, 2015 2:18 PM0 commentsViews:

ajit pawar on munde13 ऑक्टोबर : पिंपरी चिंचवडचा मेट्रो रेल्वेचा प्रकल्प केवळ एका खासदारामुळे रेंगाळला गेला असा धक्कादायक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलाय.

पुणे आणि नागपूर शहरात मेट्रो रेल्वे धावणार त्यासाठी घोषणा केल्या गेला होत्या. मात्र, नागपूरमध्ये प्रकल्पाच भूमिपूजन आधी झालं आणि या प्रकल्पावरून राजकारण सुरू झालं.

 

गेल्या वर्षभरापासून हा प्रकल्प रखड़ला आहे आणि त्यामागच कारण केवळ एका खासदाराने केलेला पत्र व्यवहार असल्याच सांगत अजित पवरानी एकच खळबळ उडवली.

पुण्यातील मेट्रो ही भुयारी मार्गानेच व्हावी असा अट्टाहस धरून बसलेल्या खासदाराने मेट्रो अडवली. त्यामुळे दर दिवसी मेट्रो मागचा खर्च 4 कोटी रुपयांनी वाढणार आहेआणि तो भुर्दंड नागरिकांच्या करावर पडणार असल्याने याला जबाबदार कोण असा सवाल ही पवार यांनी केलाय. त्यामुळे हा खासदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close