26/11 खटल्यात नारायण राणेंना साक्षीदार करण्याची मागणी कोर्टाने फेटाळली

January 27, 2010 1:31 PM0 commentsViews:

27 जानेवारी 26/11ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात नारायण राणेंना साक्षीदार बनवण्याची मागणी कोर्टाने फेटाळली आहे. कसाबच्या वकिलांनी ही मागणी केली होती. मंगळवारी विशेष कोर्टात कसाबच्या वकीलांनी बचाव पक्षाच्या वतीने साक्षीदार म्हणून नारायण राणे यांना कोर्टात बोलवण्याची परवानगी कोर्टाकडे मागितली होती. मात्र कोर्टाने त्यांची ही मागणी फेटाळली. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात भारतातल्या राजकीय नेत्यांचा हात असू शकतो असं विधान राणे यांनी केलं होतं. त्यावर कोर्टाने नारायण राणे यांना नोटीसही बजावली होती. त्या नोटीसीला राणे यांनी उत्तरही दिलं होतं.

close