दादरी, गुलाम अली प्रकरण दुर्दैवी पण केंद्राचा संबंध नाही -मोदी

October 14, 2015 1:33 PM1 commentViews:

modi on dadari14 ऑक्टोबर :दादरी हत्याकांड आणि गुलाम अली प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर मौन सोडलं. दोन्ही घटना दुदैर्वी, पण केंद्राशी संबंध नसल्यांचंही त्यांनी स्पष्ट केलं. या दोन्ही घटना राज्य सरकारच्या अधिकार कक्षेतल्या आहे. भाजप अशा घटनांना कधीच पाठिंबा देत नाही असंही मोदींनी स्पष्ट केलं. एका बंगाली वृत्तपत्राला मुलाखत देताना पंतप्रधानांनी ही प्रतिक्रिया दिलीय.

बंगाली दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी दादरी प्रकरणावर भाष्य केलं. दादरी प्रकरण दुदैर्वी आहे. गुलाम अलींच्या कार्यक्रमाला शिवसेनेनं केलेला विरोध ही दुख:द घटना आहे. या अगोदरही असे वाद झाले होते. भाजपने प्रत्येक वेळा अशा घटनांना विरोध केलाय. आज या घटनेमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला. यावर चर्चा केली तरच यावर तोडगा निघू शकतो. भाजप कधीच अशा घटनांना समर्थन करत नाही असं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं. तसंच अशा घटनांच्या आडून विरोधक राजकारण करत आहेत, असाही पलटवार त्यांनी यावेळी केला. अशा घटना म्हणजे राजकारणाच्या ध्रुवीकरणाचा परिणाम असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलीय. तर मोदी मनापासून बोलत नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Indian Politician

  देशात गरिबी, बेरोजगारी, असुरक्षा, महिलांवर बलात्कार, महागाई, भ्रष्टाचार, सगळे विषय अर्थशून्य करून टाकले.
  काय हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय चरित्र निर्माण, राष्ट्रधर्म, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय कर्तव्य, राष्ट्रीय जनजागृती, राष्ट्रीय घरवापसी, राष्ट्रीय लव जिहाद, राष्ट्रीय गोमास बंदी, राष्ट्रीय गोहत्या बंदी, राष्ट्रीय आरक्षण वगैरे वगैरे राष्ट्रीय कार्यक्रम.

  ह्याच्यात राष्ट्रीय बेरोजगारी निर्मुलन, राष्ट्रीय महागाई, राष्ट्रीय महिला बलात्कार निवारण, राष्ट्रीय भ्रष्टाचार निर्मुलन इत्यादी कुठेच नाही आहे ते फक्त राष्ट्रीय धर्म आणि राष्ट्रीय मुसलमान आणि हिंदुत्व
  मधले अंधश्रद्धा जोपासण्याची धडपड.झाले.

  चांगले कल्याण झाले देशाचे वांट लावली देशाची.
  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशात अराजकता माजवली आहे. रोज धर्माच्या बातम्या आणि धर्माच्या
  नावावर एक अपराध.

close