औषध विक्रेत्यांच्या संपाला चांगला प्रतिसाद, 8 लाख दुकानं बंद

October 14, 2015 1:48 PM0 commentsViews:

medical store strike14 ऑक्टोबर : देशभरातल्या औषध विक्रेत्यांनी आज एक दिवसाचा बंद पुकारलाय. या बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. औषधांच्या ऑनलाईन खरेदीवर बंदी घालावी, अशी त्यांची मागणी आहे.

तब्बल 8 लाख मेडिकलची दुकानं आज बंद आहेत. काही साईट्सवरुन न कुठल्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं मागवता येतात,त्यामुळे विषेशतः तरुणामध्ये स्वतःच्या मताने औषध घेण्याचं प्रमाण वाढलंय. त्याचबरोबर गर्भपातासाठी गोळ्या मागवण्याचं प्रमाणही वाढलंय. त्यामुळे तरूणींच्या जिवालाही मोठा धोका निर्माण होतं असल्याचं संघटनाचं म्हणणंय. सरकारने ताबडतोब अशा वेबसाईट्सवर बंदी घालावी अशी संघटनेची मागणी आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close