लोकशाहीर अमर शेख राष्ट्रपुरुषांच्या यादीत आहे का ?, पालिकेकडून मैदानासाठी विचारणा

October 14, 2015 1:59 PM1 commentViews:

amar shekh14 ऑक्टोबर : लोकशाहीर अमर शेख जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रमासाठी अभ्युदत नगरमधील भगतसिंग मैदान देण्याबाबत मुंबई महापालिकेकडून अजून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. उलट अमर शेख राष्ट्रपुरुषांच्या यादीत आहे का असा अजब सवालच उपस्थित केला.

समारंभ समितीच्या पदाधिकार्‍यांनी काल मनपा आयुक्त अजय मेहता यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांची भेट आयुक्तांच्या ओएसडींशी भेट झाली. त्यांनीही अमरशेखांचं नाव राष्ट्रपुरूषांच्या यादीत आहे का असा सवाल विचारून तांत्रिक बाबी सांगत कार्यक्रमासाठी मैदान देण्यास असमर्थता दाखवली.

एकीकडे शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी परवानगी नसताना शिवसेना नियमात पळवाटा शोधून तिथे सभा घेण्याचा प्रयत्न करतेय तर अमरशेख यांच्या जन्मशताब्दी वर्ष कार्यक्रमाला तांत्रिक कारण पुढे करत शिवसेनेची सत्ता असलेली मनपा परवानगी नाकारतीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Indian Politician

    शिवसेना आणि भा ज प तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकीकडे मुसलमाना मध्ये राष्ट्रभक्ती वर प्रश्नचिन्ह निर्माण करते.
    परंतु ज्या मुसलमानाने महाराष्ट्र राज्याच्या एकीकरणा करता आणि मुंबई महारष्ट्रात आणण्या करता जो संघर्ष त्या केला आणि आपले आयुष्य खर्ची घातले त्या बद्दल कृतघ्नता पण दाखवत नाही.

    ह्या तून हि मंडळी किती संकुचित वृत्तीची आहेत हे सिध्द होते.

    उद्या उधोजी आणि आदित्य ठाकरे चा पुतळा उभा कराल पण मराठी मुसलमानाचा पुतळा मात्र होऊ देणार नाही.

close