पैसा, शर्यत आणि मृत्यू !, घोड्यांचा शर्यतीचं भीषण वास्तव्य

October 14, 2015 2:45 PM0 commentsViews:

वैभव सोनावणे, पुणे

14 ऑक्टोबर : घोड्यांच्या शर्यती, त्यावर खेळला जाणारा जुगार या सगळ्या गोष्टी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा विषय..उच्चभ्रूंचा छंद जोपासण्यासाठी जोपासलेल्या या खेळाच्या झगमगाटाची एक काळी बाजूही आहे. घोड्यांची ही शर्यत अनेकदा घोड्यांच्या जीवावरच बेतते….आयबीएन लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट…

घोड्यांच्या शर्यतीचा हा थरार..पेज थ्री उच्चभ्रूंचा आवडता खेळ…पुण्यात 11 ऑक्टोबरला घोड्यांची रेस सुरू होती. गॅलरीत बसलेल्या आपल्या मालकाला जिंकून देण्यासाठी घोडे जीव तोडून धावत होते…आणि अचानक ताशी 70 किलोमीटर वेगानं धावणारा कॉन्टिनेन्टल नावाचा एक उमदा घोडा कोसळला. त्याच्यापुढच्या दोन्ही पायांची हाडं मोडली. तो आता कधीच बरा होणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं..त्यामुळे त्याला इंजेक्शन देऊन मारण्यात आलं.pune horse race44

कॉन्टिनेन्टल एकटाच नाही…या सिझनमध्ये तब्बल 9 घोड्यांचा काही ना काही कारणामुळे बळी गेलाय. एकदा दुखापत झाली की त्या घोड्याला बरं करणं जवळपास अशक्य असतं.आणि शेवटी एकच पर्याय उरतो..मृत्यू…

पूर्वी राजे महाराजांना युद्धभूमीवर साथ देणारा घोडा बदलत्या काळात रेसकोर्सवर धावू लागलाय. युद्धात शत्रूशी लढण्यासाठी आपल्या धन्यासोबतच मृत्युला कवटाळणारा घोडा आता धनिकांच्या छंदासाठी रेसकोर्सवर जीव तोडतोय.

धावणं हे घोड्याच्या रक्तातच आहे. पण तोसुद्धा एक जीव आहे, हेही ध्यानात घ्यायला हवं. पण इथं मात्र इभ्रतीपायी घोड्याच्या जीवाचाच सट्टा लावला जातो.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close