एपीएमसी संचालकांचं मंडळ युरोप दौर्‍याच्या तयारीत

January 27, 2010 1:37 PM0 commentsViews: 11

27 जानेवारी देशात महागाईचा भडका उडालेला असताना, नवी मुंबईतल्या एपीएमसीचं संचालक मंडळ युरोपच्या टूरवर निघालं आहे. आयबीएन-लोकमतच्या हाती असलेल्या माहितीनुसार पंचवीस जणांचं शिष्टमंडळ युरोपमधील बाजारपेठांचा अभ्यास करण्यासाठी जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव एपीएमसीने मंजुरीसाठी बोर्ड मिटींगमध्ये आणला आहे. या टूरमुळे 25 संचालकांवर 50 लाखांहून अधिक खर्च होणार आहे. बुधवारी होणार्‍या एपीएमसी संचालकांच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे.

close