परिस्थितीपुढे चितपट, कुस्तीपटूवर कांद्याच्या गोण्या उचलण्याची वेळ !

October 14, 2015 6:45 PM1 commentViews:

हलीमा कुरेशी, पुणे

14 ऑक्टोबर : कर्नाटकातले राष्ट्रीय पातळीवरचे दोन खेळाडू सध्या पुण्यात आले आहे. खेळाच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नाही. तर कामाच्या शोधासाठी…ही कहाणी आहे कर्नाटकाची आंतरराष्ट्रीय पातळीची सायकलपटू आणि कोच गंगू तेरडल आणि तिचा पती अपासी तेरडलची…

जगण्यासाठी कांद्याच्या गोण्या उचलणं त्याच्या नशिबी आलंय. आयुष्यात हमालीसुद्धा करावी लागेल याची कल्पनाच त्यानं केली नव्हती. तो मुळात हमाल नाहीच. तर तो कर्नाटकचा राष्ट्रीय कुस्तीपटू आहे..अपासी तेरडल..आपली दोन मुलं आणि पत्नीला घेऊन तो जगण्यासाठी पुण्यात आलाय.

PUNE_tardml“मी माणुसकी म्हणून काम दिलं…मला शेंगा मागितल्या त्या मी दिल्या मात्र नंतर तो एकदम रडायला लागला. अपान कुस्तीपटू असून नोकरीसाठी पैसे भरू न शकल्याने ही अवस्था झाली ” असं व्यावसायिक दिगंबर राठींनी सांगितलं

ही सगळी प्रमाणपत्रं आहेत…अपासी तेरडल आणि त्याची पत्नी गंगू तेरडल यांची..त्याची पत्नीही नावाजलेली सायकलपटू आहे. या दोघांनीही मैदान गाजवल्याचे हे पुरावे…अनेक मेडल्स…पण, आता त्यांना चिंता आहे. दोन वेळच्या जेवणाची..एवढी सारी गुणवत्ता त्यांना नोकरीसाठी उपयोगाची नाही. कारण तिथं ही प्रमाणपत्रं चालत नाहीत, तिथं चालतात फक्त नोटा..

मुलांच्या औषधासाठी दीड लाखांची सायकल तीस हजाराला विकली अशी व्यथा गंगू तेरडल यांनी मांडली.

या दोघांचे विद्यार्थी आज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतायत. अनेकांनी चांगल्या नोकर्‍याही पटकावल्यात. पण, यांना मात्र आपल्या चौकोनी कुटुंबाचं पोट भरण्यासाठी मोलमजुरी करावी लागतेय. मुलांना ऍथलेट बनवण्याची अपासीची इच्छा या कांद्याच्या गोणीखाली आता दबून गेलीय.

राष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या या खेळाडूंना परिस्थितीनं रस्त्यावर आणलंय. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू घडवण्याचं स्वप्न पाहणार्‍या भारतासाठी हे दृश्य लाजीरवाणं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ajay A Lingayat

    लाचखोर हरामखोर सरकारी अधिकारी …. कुले सडतील त्यांचे ………

close