टेनिसपटू सानिया मिर्झाचं लग्न मोडलं

January 28, 2010 8:35 AM0 commentsViews: 3

28 जानेवारीभारताची आघाडीची महिला टेनिसपटू सानिया मिर्झाचं लग्न मोडलं आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने याबाबतची बातमी छापली आहे. 10 जुलै 2009ला सानियाचा मोहम्मद सोहराब मिर्झा याच्याशी साखरपुडा झाला होता. सध्या मिर्झा इंग्लडमध्ये शिक्षण घेत आहे. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. पण आता आमचे विचार जुळत नसल्याचं आमच्या लक्षात आलं, त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतल्याचं सानियाने म्हटलं आहे. सानियापेक्षा एक वर्षाने मोठा असलेला मिर्झा कॉमर्स ग्रॅज्युएट आहे.

close