‘मिल्खासिंग’ उगलेंनी फडकावला सातासमुद्रापार झेंडा

October 14, 2015 9:04 PM0 commentsViews:

nadu ugale14 ऑक्टोबर : नाशिकच्या पोलीस दलातील” मिल्खासिंग” म्हणून ओळख असलेल्या धावपटू पोलीस कॉन्स्टेबल नंदू उगले यांनी पुन्हा एकदा भारताचा झेंडा सातासमुद्रापार फड़कवला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या मास्टर ओपन ऍथलेटिक स्पर्धेत तब्बल पाच पदकांची कमाई केलीय.

कुठल्याही स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते असे म्हणतात हीच गोष्ट पोलीस कॉन्स्टेबल नंदू उगले यांनी खरी करून दाखवली आहे. पोलीस दला सारख्या धकाधकीच्या ठिकाणी काम करतांना आपला फिटनेस ठेवण्यासाठी नंदू उगलेंनि वयाच्या 41 व्या
वर्षी धावण्याच्या सराव करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी विविध स्पर्धामध्ये भाग घेत अनेक पदकांची कमाई केली. आर्थिक अडचणी वर मात करत ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या मास्टर ओपन ऍथलेटिक स्पर्धेत तब्बल पाच पदकांची कमाई केलीय. त्यांच्या या यशाबद्दल नाशिक मध्ये येताच त्यांचे नाशिककरांनी जंगी स्वागत केलं.

नंदू उगले यांनी मिळवलेले पदक
- 1500 मीटर स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक
- 1600 मीटर स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक
- 800 मीटर स्पर्धेमध्ये रौप्य पदक
- 21 किमी हाफ मेरेथान स्पर्धेमध्ये कास्य
- 5 हजार मीटर स्पर्धेमध्ये रौप्य
 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close