मुंबईकरांना भरावा लागणार जागेच्या बाजारभावानुसार मालमत्ता कर

January 28, 2010 8:37 AM0 commentsViews: 23

28 जानेवारी मुंबईकरांना आता जागेच्या बाजारभावानुसार मालमत्ता कर भरावा लागणार आहे. बुधवारी झालेल्या महानगरपालिका सभागृहाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे उपनगरवासियांना दिलासा मिळणार आहे. पण शहरी भागातल्या राहिवाशांवर करांचा बोजा वाढणार आहे. यापूर्वी शहरी भागात जागांचे भाव जास्त होते. पण मालमत्ता कर कमी होता. तर उपनगरात जागेचे भाव कमी असूनही मालमत्ता कर जादा भरावा लागत होता. या प्रस्तावामुळे मुंबई महानगरपालिकेच्या महसूलात वाढ होणार नसली तरी शहर आणि उपनगर या दोन भागांतील विषमता दूर होण्यास मदत होणार आहे. नव्या कराचा आराखडा तयार करण्यासाठी आयुक्त स्वाधिन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे माजी मुख्य सचिव द.म. सुखथनकर यांच्यासह इतर तज्ञ्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून नव्या धोरणानुसार कर आकारण्याचा पालिकेचा विचार आहे. मात्र 500 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांच्या मालमत्ता करात पुढील पाच वर्षात वाढ होणार नाही. महानगरपालिकेला दरवर्षी मालमत्ता करांच्या माध्यमातूम 1400 कोटी रुपये मिळतात.

close