भेट एका व्रतस्थ पत्रकाराची…

October 14, 2015 9:25 PM0 commentsViews:

प्रणाली कापसे,मुंबई

14 ऑक्टोबर : ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना यावर्षीचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालाय. 3 डिसेंबर रोजी या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे. याच निमित्तानं पाहुयात दिनू रणदिवे यांच्या कार्याबद्दल…

दहा बाय दहाच्या खोलीत 90 वर्षांचे हे आजोबा आहेत, जेष्ठ पत्रकार दिनू रणदिवे…अख्खी हयात या माणसानं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपर्‍यात भटकंती करुन मराठी माणसांपर्यंत बातमी पोहचवण्याचं काम केलं. 1985 ला ते निवृत्त झाले, त्यानंतरही त्यांची भटकंती सुरूच होती. या धडपड्या पत्रकाराला भेटण्यासाठी आम्ही त्यांचं घर गाठलं..dinu randive

दिनू रणदिवेंचं सगळं आयुष्यच साधेपणात गेलं. त्यांच्या पत्नी शिक्षिका होत्या. त्यांच्या घरात नजर टाकली तर, दोनच गोष्टी दिसतात, एक म्हणजे पुस्तकं आणि दुसरी म्हणजे जुन्या वर्तमानपत्रांचा ढीग…ते म्हणतात हीच माझी संपत्ती आहे. रणदिवेंसोबतच्या आयुष्यात काय मिळवलं या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या पत्नी अतिशय सुंदर शब्दात देतात.

आपलं संपूर्ण आयुष्य लेखणीच्या माध्यमातून समाजासाठी वेचणार्‍या या ज्येष्ठ पत्रकाराचा सन्मान व्हायला त्यांच्या निवृत्तीनंतरचं 20 वं वर्ष उजडावं लागलं. याची खंत त्यांनाही वाटते.

अशा व्रतस्थ पत्रकारांच्या आयुष्याकडं पाहिलं की, समाजासाठी पुढं सरसावणार्‍या लेखणी आणखी धारदार व्हायला लागतात. महाराष्ट्राला दिनू रणदिवेंसारख्या पत्रकारांचा वारसा आहे, म्हणूनच पत्रकारांच्या लेखणीला कधीच शब्दांची आणि परंपरेची वाणवा भासणार नाही, हेही तितकंच खरं….

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close