अखेर जिंकलो, भारताने द.आफ्रिकेचा 22 रन्सने केला पराभव

October 14, 2015 9:50 PM0 commentsViews:

ind vs sat win14 ऑक्टोबर : कसोटी आणि टी-20 मालिकेत लाजिरवाण्या पराभवानंतर अखेर भारताचा विजयी सूर गवसला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतानं पहिल्या विजयाची नोंद केली आहे.

इंदौरला झालेल्या दुसर्‍या वन-डेमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 22 रन्सनी पराभव केलाय. पहिल्यांदा बॅटिंग करतांना भारतानं 50 ओव्हरमध्ये 247 रन्स केले. भारताकडून महेंद्र सिंग धोणीनेनं सर्वाधिक 92 रन्स केले. तर अजिंक्य रहाणेनं हाफ सेंच्युरी केली. त्यानंतर भारतीय बॉलर्सनी जबरदस्त बॉलिंग करत, दक्षिण आफ्रिकेला 225 रन्सवर ऑल आऊट केलं.

अक्सर पटेल आणि भुवनेश्वर कुमारनं प्रत्येकी 3 विकेट्स घेत, भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. धडाकेबाज 92 रन्स करणार कॅप्टन धोणी मॅन ऑफ द मॅच राहिला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close