आत्महत्येपूर्वी परमार यांनी डायरीतून ‘त्या’ नेत्यांची नावं खोडली !

October 14, 2015 10:14 PM1 commentViews:

suraj parmar14 ऑक्टोबर : बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणाला नाट्यमय वळण लागलंय. परमार यांच्या डायरीतल्या महत्त्वाच्या पानावर खाडाखोड करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्यांच्या डायरीची पानं आयबीएन लोकमतच्या हाती लागली आहे.

परमार यांनी स्वतःच राजकारण्यांची नावं खोडली होती. आत्महत्येपूर्वी भीतीमुळे त्यांनीही नाव खोडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आपल्या मृत्यूनंतर हे नेते कुटुंबीयांना त्रास देतील, अशी परमार यांना भीती होती.

नेत्यांना लाच न दिल्यामुळे आत्महत्या करावी लागतेय असंही परमार यांनी डायरीत म्हटलंय. त्यामुळे त्यांनी नेमकी कोणत्या नेत्यांची नावं खोडली आणि ते नेते कोण होते असा प्रश्न आता उपस्थित झालाय.

परमार यांच्या डायरीत

– मी हरलो सर, आता मला कळतंय, वेळेत प्रॉजेक्ट्स पूर्ण होण्यासाठी मी राजकारण्यांना लाच द्यायला हवी होती. जेव्हा XXXX, XXXX, XXXX, XXXX XXXX सारख्या राजकारण्यांनी मला लाच मागून छळलं, तेव्हा मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो. पण आता मला वाटतं मी..
*(नावं खोडली आहेत कारण ते माझ्या कुटुंबीयांचे शत्रू होतील.)

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Yezdi Motiwalla

    Yezdi Motiwalla Respected Mr DSK pls I am asking you a question Why Hitler ism still exists in your BUILDERS LOBBY why i am being refused to have a NOC in second resale also with the same buildder First he forced me to quit by a sms “ANY MORE MSG TO ME YOU MAY NOT GET YOUR FLAT AS WELL ” when i asked for my ‘CLEAN TITLE “OF THE FLAT 7 BASIC AMENITIES LIKE “WATER” IS White Collar Sharks exist in our country In solidarity Jai Hind

    Like · Reply · Just now

close