वर्षपूर्तीनिमित्ताने भाजपच्या शिलेदारांची बैठक

October 15, 2015 1:28 PM1 commentViews:

cm_devendra_fadanvis_ (2)15 ऑक्टोबर : सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सर्व आमदारांची आज मुंबईत बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी वर्षपूर्तीचं कारण दिलं असलं तरी भाजप आणि शिवसेनेमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. सरकारनं राबवलेल्या योजना लोकांपर्यंत प्रभाविपणे कशा पोहोचावता येतील याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. दोन्ही पक्षांमधला तणाव आणि राज्य सरकारची प्रतिमा सुधारणं हाच या बैठकीचा मुख्य उद्देश आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Vinayakrao Bhavsar

    Delayed in sanctioning 6% D.A. 7months later. and now F.M. not giving arrears w.e.f. 1st January 2015 to 30/9/2015

close