मुख्यमंत्र्यांचा हाच का दुष्काळी दौरा ?, फी न भरल्यामुळे हजारो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित !

October 15, 2015 1:39 PM0 commentsViews:

cm in osmanabad415 ऑक्टोबर : मराठवाड्याच्या दुष्काळ दौर्‍यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफ केल्याची घोषणा मोठ्या राणाभीम देवी थाटात केली होती. पण, एकट्‌या उस्मानाबाद जिल्ह्यातच तब्बल 3 हजार विद्यार्थी केवळ फी भरायला पैसे नाहीत म्हणून परीक्षेला बसू शकलेले नाहीत. विद्यापीठाकडूनच यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.

मराठवाड्यात तब्बल 20 टक्के विद्यार्थी परीक्षेला बसलेले नाहीत. खरंतर दुष्काळग्रस्त भागातली फी माफीची घोषणा सरकारने केली होती. पण त्याच्या अंमलबजावणीचा जीआरच शासकीय अधिकार्‍यांनी न काढल्याने या 3 हजार विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलंय.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर दुष्काळावरुन टीका केली होती. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी सरकारने केली नाही अशी टीका पवारांनी केली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close