रिमोटच्या साहाय्याने तब्बल 12 लाखांची वीज चोरी

October 15, 2015 7:54 PM0 commentsViews:

pune veej chori15 ऑक्टोबर : वीज चोरीचे वेगवेगळे प्रकार तुम्ही पहिले असतील..ऐकले असतील..पण पुण्यात उघड झालेल्या वीज चोरीच्या प्रकारानं महावितरणचीही मती गुंग झालीये. रिमोटच्या साहाय्यानेथोडीथोडके नाही तर तब्बल 83 हजार युनिट वीज चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.

बाजारभावानुसार या वीजेचं बील 11 लाख 92 हजार रुपये आहे. याप्रकरणी नांदेडगावमधल्या अक्षय इंडस्ट्रीज’ या बर्फ तयार करणार्‍या कारखान्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. धनकुडे असे या कारखान्याच्या मालकाचे नाव आहे.

वीजप्रवाह सुरू असतानाही वापरलेल्या विजेची नोंद मीटरमध्ये होणारच नाही, अशी रिमोटच्या साह्याने नियंत्रित होणारी यंत्रणा वीज मीटर बसविण्याच्या यंत्रणेमध्ये छुप्या पद्धतीने बसविली गेली होती. संबंधित कारखान्यामध्ये विजेचा होत असलेला वापर आणि मीटरमध्ये होत असलेली नोंद याबाबत महावितरणच्या अभियंत्यांना आधीपासूनच शंका होती. त्यानुसार मीटरची तपासणी केली.

पण त्यामध्ये कोणताही दोष आढळून आला नाही. अखेर मीटरमध्ये बसविण्यात येत असलेली सीटी नावाची यंत्रणा ग्राहकासमोरच फोडली. तेव्हा हा वीज चोरीचा प्रकार उघडकीस आला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close