शिवसेना सत्तेसाठी लाचार, राणेंची घणाघाती टीका

October 15, 2015 8:36 PM0 commentsViews:

uddhav and rane15 ऑक्टोबर : शिवसेनाला बाहेर पडायचं तर बाहेर पडावं. शिवसेना सत्तेत उशिरा आली आणि उलट हेच भाजपला सत्तेत बाहेर पडण्याचं आव्हान देत आहे. किती लाचार असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना आहे अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केली. तसंच ज्या प्रकारे शिवसेना सत्तेत राहुन वागत आहे. त्यामुळे त्यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार सुद्धा नाही अशी प्रखर टीकाही राणेंनी केली.

शिवसेना आणि भाजपमधील वादावर आता काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी भाजपवरही हल्लाबोल चढवला. महागाईच्या मुद्द्यावर त्यांनी निशाणा साधत सरकारला सत्तेवर रहाण्याचा नैतिक अधिकार नाही. डाळींवरील निर्बंध काढल्यानं भाववाढ झाली आहे अशी टीका राणेंनी केली. तसंच हे सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत गंभीर नाही. दिलेली आश्वासनं पूर्ण करत नाही. दुष्काळाबाबत या सरकार काहीही घेणं देणं नाही. उलट शेतकर्‍याला आत्महत्यांना प्रवृत्त करण्याचं काम सेना भाजपचं सरकार करतंय असा गंभीर आरोप राणेंनी केला. यानंतर त्यांनी आपला मोर्चा सेनेकडे वळवला. शिवसेना आज सत्तेत आली आहे. आधी हे विरोधीबाकावर बसले होते. आता सत्तेत येऊन हे भाजपलाच सत्तेतून बाहेर पडण्याचं आव्हान देत आहे. किती लाचार असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना आहे. ज्या प्रकारे शिवसेना वागत आहे त्यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीका राणेंनी केली. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकत्र बसून राज्य सुरळीत चालवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असा सल्लाही राणेंनी दिला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close