‘कोका-कोला’चा पाणी पुरवठा 48 तासात बंद करा – नितेश राणे

January 28, 2010 1:34 PM0 commentsViews: 2

28 जानेवारी 'कोका कोला' कंपनीला केला जाणारा बेकायदा पाणी पुरवठा 48 तासात बंद केला नाही तर 'कोका- कोला'चे एकही उत्पादन विकू देणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. 'स्वाभिमान' संघटनेने यासंदर्भात कोका-कोला कंपनीला गुरुवारी एक पत्र पाठवलं. सध्या मंुबईकरांना पाणीटंचाई भेडसावत आहे. पण याच वेळी ठाणे जिल्ह्यातल्या कोका कोला कंपनीला रोज 10 लाख लिटर पाणी दिलं जातं. ही कंपनी वाडा तालुक्यातल्या कुडूस गावात आहे. कंपनीला वैतरणा नदीतल्या पिण्याच्या पाण्याचा बेकायदेशीर पुरवठा केला जातो, असा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. स्वाभिमान संघटनेनं कोका कोलाविरूद्ध बुधवारीच मुंबई महानगरपालिकेकडेही तक्रार केली आहे.

close