पैसे द्या दर्शन घ्या : शिर्डी संस्थानाची नवीन योजना

January 28, 2010 1:36 PM0 commentsViews: 11

28 जानेवारी शिर्डी संस्थानने पैसे मोजून झटपट दर्शन देण्यासाठी नवीन योजना जाहीर केली आहे. त्यानुसार शनिवार, रविवार आणि सुट्यांच्या दिवशी पैसे मोजून वीआयपी आणि धनिक लोकांसाठी स्वतंत्र रांग लावण्यात येईल. त्यामुळे या व्हीआयपी भक्तांची सर्वसामान्यांच्या गर्दीतून सुटका होणार आहे. काकड आरतीसाठी 500, धूप आरती आणि शेजारतीसाठी 300 रूपये तर स्पेशल दर्शनासाठी या मंडळींकडून 100 रूपये आकारले जाणार आहेत.

close