शिवेसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत आज होणार सुनावणी

October 16, 2015 8:15 AM0 commentsViews:

5291875981955949679_Org

16 ऑक्टोबर : यंदाचा शिवेसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात, दसरा मेळाव्याचा कार्यक्रम दादरच्या शिवाजीपार्कवरच करण्याची परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज (शुक्रवारी) सुनावणी होणार आहे.

शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान असून ते शांतता क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे. त्यामुळे तिथे खेळाव्यतिरिक्त अन्य कुठल्याही कार्यक्रमासाठी न्यायालयाची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेतर्फे दरवर्षी अर्ज केला जातो. गेल्या वर्षी न्यायालयाने शिवसेनेला परवानगी नाकारली होती. यंदा मात्र सर्व नियंमांचं पालन करत, सांस्कृतीक कार्यक्रमाच्या नियमावलीत बसवून, शिवसेना दसरा मेळावासाठी परवानगी मागत आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शस्त्र पूजनाचा कार्यक्रम होत असतो, हा सांस्कृतीक कार्यक्रम असल्याने दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवरच परवागनी मिळावी यासाठी शिवसेना आग्रही आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी न्यायालयात याचिका केली आहे. त्यामुळे न्यायालय शिवसेनेच्या या मागणीला हिरवा कंदील दाखवणार की नाही याचा आज निर्णय होणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close