माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन पाटील यांचं निधन

October 16, 2015 9:45 AM0 commentsViews:

unnamed (15)16 ऑक्टोबर : राज्यातील माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन पाटील (55) यांचं आज (शुक्रवारी) मुंबईत अल्पशा आजारने निधन झालं. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मदन पाटील हे सांगलीचे माजी खासदार आणि माजी आमदार होते. 2009 साली आघाडी सरकारमध्ये पाटील यांनी राज्याच्या महिला आणि बालकल्याण, पणन आणि रोजगार हमी योजना मंत्री पदाचा कारभार सांभाळला होता. सांगली महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसचे ते नेते होते. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर आठचं महिन्यांत मदन पाटील यांच्या निधनामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राला दुसरा मोठा धक्का बसला आहे.

मदन पाटील यांचं निधन

वसंतदादा पाटील यांचे चुलत नातू
विष्णूअण्णा पाटील यांचे पुत्र
काँग्रेसकडून 2 वेळा खासदार
2 वेळा आमदारही होते
2005 साली राज्यमंत्रिपद सांभाळले
महिला बालकल्याण, पणन, रोहयो खात्याचे मंत्री
वसंतदादा पाटील साखर कारखान्याचे चेअरमन
जिल्हा बँकेचंही संचालकपद भूषवलं
सांगली महापालिकेच्या राजकारणावर मजबूत पकड
सांगलीतील सहकारी संस्थांवर मोठा प्रभाव

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close