मोबाईलधारकांसाठी खुशखबर, कॉल ड्रॉप्स झाल्यास आता मिळणार नुकसान भरपाई

October 16, 2015 2:31 PM0 commentsViews:

No call drops

16 ऑक्टोबर : मोबाईलधारकांसाठी एक खुशखबर, यापुढं फोन सुरू असताना कॉल ड्रॉप झाल्यानंतर ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉल ड्रॉपच्या वाढत्या घटना पाहता टेलीकॉम क्षेत्रावर नियंत्रण ठेवणार्‍या ट्राय या संस्थेनं टेलीकॉम कंपन्यांना कॉल ड्रॉप झाल्यानंतर ग्राहकांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

सीएनएन-आयबीएननं काही महिन्यांपूर्वी नॉ कॉल ड्रॉप्सची मोहिम राबवली होती. त्यानंतर ट्रायने काही दिवसांपूर्वी मुंबई आणि दिल्लीत कॉल ड्रॉपचं ऑडिट घेतलं होतं. त्यानंतर टेलिकॉम रेग्युलेटरी बोर्डाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

5 सेकंदाच्या आधी जर कॉल कट झाला तर त्याची भरपाई या कंपन्यांना द्यावी लागणार आहे. कॉल ड्रॉप झाल्याच्या चार तासांमध्ये ग्राहकाला एसएमएस पाठवला जाईल व त्यांच्या खात्यात भरपाई जमा होईल. तर पोस्ट पेड ग्राहकांना पुढील बिलात ही भरपाई मिळणार आहे.

मुंबई आणि दिल्लीसारख्या बड्या शहरांमध्ये कॉल ड्रॉपच्या फार मोठ्या समस्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांच्या सेवेत सुधारणा होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रायचं म्हणणं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close