सतीश शेट्टी हत्येप्रकरणी विजय दाभाडेवर खुनाचा गुन्हा दाखल

January 28, 2010 1:37 PM0 commentsViews: 2

28 जानेवारी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी ऍड. विजय दाभाडेंसह तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच हत्येप्रकरणीच या आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. याआधी सतीश शेट्टी यांच्या खूनाचा कट रचल्याच्या गुन्ह्याखाली या तिघांना पोलीस कोठडी देण्यात आली होती. तिची मुदत गुरुवारी संपली. त्यानंतर कोर्टात झालेल्या सुनावणीत या तिनही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. चौकशीनंतर या तिघांनी सतीश शेट्टी यांचा खून केल्याचा गुन्हा पोलिसांनी नव्याने दाखल केला आहे. मात्र यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी जामीन मिळू शकणार नाही.

close