शिक्षकाकडून विद्यार्थ्याचा लैंगिक छळ

January 28, 2010 1:39 PM0 commentsViews: 2

28 जानेवारी दारूच्या नशेत शाळेतल्या शिक्षकानेच पाचवीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याचा लैंगिक आणि मानसिक छळ करण्याचा प्रकार धुळ्याच्या सरकारी शाळेत घडला आहे. सरकारी विद्यानिकेतन या शाळेतील अशोक चौधरी या नराधम आणि दारूड्या शिक्षकाने हा प्रकार केला. त्याने विद्यार्थ्याला कपडे काढून नाचायला लावलं. आणि त्या मुलाचा लैंगिक छळही केला. विशेष म्हणजे या आधीही असे अनेक प्रकार या शिक्षकानं केले आहेत. मात्र या शिक्षकावर त्यावेळी कोणतीही कारवाई शाळेने केलेली नाही. आताही हे प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न होत आहे. याबाबत शोळेचे मुख्याध्यापक बी.एस.सूर्यवंशी यांनी संबधीत शिक्षकाच्या निलंबनाचा आजच्या आजच प्रस्ताव करून पाठण्याच आश्वासन दिलं आहे. तसेच हा प्रकार खूपच निंदनीय असल्याचं म्हटलं आहे.

close