दारूचं दुकान आणि धार्मिक तेढ नसलेल्या गावांनाच करणार मदत -नाना

October 16, 2015 5:05 PM2 commentsViews:

Nana patekar16 ऑक्टोबर : आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर सरसावलेत. पण गाव दत्तक घेताना काही अटीसुद्धा ‘नाम’ फाऊंडेशनने घातल्या आहेत. ज्या गावात दारूचं दुकान नसेल, गावात राजकीय भांडणं नसतील आणि धार्मिक तेढ नसेल, अशाच गावांना ‘नाम’ दत्तक घेणार आहे असं नाना पाटेकर यांनी जाहीर केलं.

पुण्यात गुरुवारी ‘कॉफी विथ नाना’ हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात नानांनी हे जाहीर केलं. या कार्यक्रमात पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने दोन लाख रूपये दुष्काळग्रस्तांसाठी नाम फाऊंडेशनला देणार असल्याचं जाहीर केलंय. लायन्स क्लबकडून आयोजन आणि मदत देण्याचा हा कार्यक्रम होता. नाम फाऊंडेशनचा नवीन उपक्रम ज्या गावात दारूचं दुकान नाही जातीय सलोखा मजबूत असेल आणि राजकीय वितुष्ट नसलेल्या गावांना पाण्याच्या बाबतीत स्वंयपूर्ण होण्यासाठी मदत करणार असल्याचंही नानांनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Mangesh Barhate

    Devdut..

  • Harshada Lingayat

    Mast

close