धूम-4 मध्ये ह्रतिकची पुन्हा एंट्री, बिग बीही असणार ?

October 16, 2015 4:23 PM0 commentsViews:

dhoom 416 ऑक्टोबर : ‘धूम’ सिनेमांची मालिकेमधील चौथा सिनेमावर लवकरच काम सुरू होणार आहे. सिनेमाची खासीयत म्हणजे सिनेमातला नायक अभिषेक बच्चन आणि त्याचा साथीदार उदय चोप्राला कायम ठेवत सिनेमातला व्हिलन दर सिनेमात नवीन घेतला जातोय. त्यामुळे चौथ्या भागात पुन्हा एकदा ह्रतिक रोशन एंट्री करणार अशी शक्यता आहे. तसंच बिग बीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

‘धूम’च्या पहिल्या भागात जॉन अब्राहमने ही भूमिका पार पाडली. नंतर हृतिक रोशन यात दिसला आणि तिसर्‍या भागात आमिरने ही भूमिका निभावत सिनेमाला हीट सिनेमांच्या लीस्टमध्ये एका वेगळ्याच स्थानावर नेऊन ठेवलं. यामुळे सिनेमाकडून फारच अपेक्षा वाढल्यात. चौथ्या भागात सिनेमात कोण दिसणार यावर अनेक चर्चा रंगू लागल्यात. यावर असं समजतंय की, सिनेमातील आधीचा चेहरा हृतिक पुन्हा दिसणार असल्याचं कळतंय आणि त्याच्या जोडीला सिनेमाला चार चाँद लावण्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन देखील सिनेमात एक मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. हे समजल्यानंतर सिनेमाची उत्सुकता अधिक वाढलीये हे निश्चित…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close