शिवाजी पार्कवर आवाज शिवसेनेचाच !

October 16, 2015 9:30 PM0 commentsViews:

16 ऑक्टोबर : दसरा जवळ आलाय. पण दसर्‍याला सोनं लुटण्यापेक्षाही आपल्याला उत्सुकता असते ती शिनसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार की नाही याची. मुंबई हायकोर्टाने सेनेला आज या मेळाव्यासाठी परवानगी दिलीय. याबद्दलचाच एक रिपोर्ट….

dasra melawa33शिवसेना, दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क.. यांचं एक अतूट नातं आहे. बाळासाहेबांच्या अनेक सभा शिवाजी पार्कवर झाल्या…गाजल्या. 1966 सालची शिवसेनेची पहिली सभासुद्धा शिवाजी पार्कवरच झाली होती. आजही, सेनेच्या दसरा मेळाव्याला लोक येतील की नाही हा प्रश्न नसतो, तर किती लाख लोक येणार हा प्रश्न असतो.

इतकी वर्ष दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे समीकरण अबाधित होतं.पण, नंतर मात्र ध्वनीप्रदूषणाचे नियम कडक झाले. शिवाजी पार्क परिसर सायलेन्स झोन म्हणून जाहीर झाला. त्यामुळे तिथे जाहीर सभा घेण्यावर बंदी आली. पण सेनेला शिवाजी पार्क सोडवेना. गेल्या काही वर्षांत तर सेनेसाठी हा प्रतिष्ठेचा प्रश्न झाला. आणि विरोधकांसाठी चर्चेचा. यावर्षाही सेना कोर्टात गेली, आणि दसरा मेळावा पार्कातच घेऊ द्या, अशी विनंती त्यांनी केली. कोर्टाने ती मान्यही केली..

यातली एक रंजक बाब म्हणजे मनसेनंही हायकोर्टात एक याचिका केलीय. नाही, नाही. सेनेला मेळावा घेऊ देऊ नका, अशी ही याचिका नाही.. तर सेनेसारखंच आम्हालाही शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेऊ द्या.. कोर्टाने घालून दिलेले सर्व नियम आम्ही पाळू, अशा अर्थाची ही याचिका आहे.

राजकीय पक्षांची गरज, बदलते कायदे, सुधारणा आणि दक्ष न्यायव्यवस्था..या सगळ्यामुळेच दरवर्षी दसरा मेळाव्यावर टांगती तलवार असते. पण, यावर्षी मात्र आवाज कुणाचा, शिवसेनेचा हा नारा शिवाजी पार्कवर घुमणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close