‘मुळा- प्रवरा’चं लायसन्स रद्द होण्याची शक्यता

January 28, 2010 1:40 PM0 commentsViews: 9

28 जानेवारी 'मुळा प्रवरा' संस्थेचं लायसन्सच रद्द होण्याची शक्यता आहे. वीजपुरवठा करणार्‍या या कंपनीकडे 2 हजार कोटींची थकबाकी आहे. कंपनीचं लायसन्सच रद्द करण्याची याचिका एमईआरसीने दाखल करून घेतली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांची ही कंपनी आहे. याआधीही एमईआरसीने अनेक वेळा नोटीस बजावूनही थकबाकीची रक्कम भरलेली नाही. त्यात 1 एप्रिलपासून लेटर ऑफ क्रेडिट द्या, नाही तर वीज कापली जाईल, असं सांगण्यात आलं आहे. तसंच 2 मार्चपासून परवाना रद्द करण्याची सुनावणी सुरू केली जाईल, असंही एमईआरसीने स्पष्ट केलं आहे. त्याआधी बाहेरच्या राज्यातून वीज विकत घ्यायची असेल, तर घ्या आणि ग्राहकांना द्या, असे स्पष्ट निर्देश संस्थेला दिले आहेत.

close