पवारांचं भाजपसोबत ‘व्हॅलेंटाईन’ सुरूच !

October 17, 2015 1:50 PM0 commentsViews:

jetli in baramati17 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचं बारामतीत सुरू झालेलं ‘व्हॅलेंटाईन’ सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर आता केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनीही पवारांचा पाहुणचार घेतला. काल पवारांच्या घरी मुक्कामानंतर आज नियोजित कार्यक्रमासाठी जेटली आणि पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते आज बारामतीत शेती शाळेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन पार पडलं. यावेळी शरद पवार यांनी जेटलीसमोर साखर कारखान्यांचा प्रश्न मांडला. सरकारनं साखर कारखान्यांकडे लक्ष दिलं पाहिजे, सध्या ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, त्यांना मदत करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

तसंच अर्थमंत्र्यांना बारामतीत बोल्यावण्यामागं स्वार्थ दडला असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. सरकारने साखर उद्योगाकडे आस्थेने बघावं आणि अडचणीत आलेल्या साखर उद्योगाला आर्थिक मदत करावी अशी मागणी पवारांनी केलीये. तर अप्पासाहेब पवार सभागृहात बारामतीच्या विकासाचं जेटलींनी तोंड भरून स्तुती केली. बरंच काही शिकण्यासारखं असल्याचंही त्यांनी मान्य केलं.

या कार्यक्रमानंतर जेटली यांच्या हस्ते इंजिनिअरिंग कॉलेजच्या इमारतीचा नामकरण सोहळा पार पडला. या इमारतीला कमलनयन बजाज याचं नाव देण्यात आलंय. बारामतीमध्ये गदिमा सभागृहात याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर जेटली पुण्याच्या दिशेने रवाना झाले. पुण्यातल्या सेनापती बापट मार्गावर असलेल्या जे. डब्ल्यू मॅरियट हॉटेलवर जेटली दुपारी पोहोचतील. त्यानंतर दुपारी 4 वाजता त्यांच्या इतर कार्यक्रमांना सुरूवात होईल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close