‘माय नेम इज खान’ला शिवसेनेचा विरोध

January 29, 2010 7:50 AM0 commentsViews: 2

29 जानेवारी 'माय नेम इज खान' या सिनेमाच्या विरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं आहे. ठाण्यातल्या इटर्निटी मॉलच्या व्यवस्थापनाला 'माय नेम इज खान' रिलीज न करण्याचं पत्र शिवसेनेनं दिलं आहे. या मॉलच्या बाहेर असलेली सिनेमाची पोस्टर्सही फाडण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी शाहरुखने पाकिस्तानी खेळाडूंना आपल्या देशात खेळू दिलं पाहीजे असं वक्तव्य केलं होतं. 'शाहरुखमधला खान जागा झाला असेल तर त्याने कराची किंवा इस्लामाबादमध्ये जावं. पाकिस्तानातल्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये खेळून दाखवावं, मग शाहरुख मुंबईत कसं काम करतो ते आम्ही बघूच, अशी धमकी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना कायदा हातात घेणार्‍यांवर कारवाई करू असं गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी म्हटलं आहे. शाहरुख खानला शिवसेनेने दिलेल्या धमकीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसंच शाहरुख खानने सुरक्षा मागितली तर त्याला पूर्ण सुरक्षा दिली जाईल असंही बागवे यांनी सांगितलं आहे.

close