नव्या ‘ऍपल 6 एस’साठी ठाणेकरांच्या दुकानाबाहेर रांगा

October 17, 2015 5:00 PM0 commentsViews:

thane apple17 ऑक्टोबर : तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाण्याची आज अद्यावत आणि उच्चभू राहणीमानाचे ठाणे अशी नवीन ओळख झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचे स्थान असलेला ठाणे जिल्हा आता तंत्रज्ञानांमध्ये ही अग्रेसर ठरत आहे.

गुरुवारी मध्यरात्री कोरम मॉल मध्ये “ऍपल कंपनी”च्या अद्यावत अशा “ऍपल एस-6″ आणि “ऍपल एस -6 प्लस” या मोबाईल फोनचे अभिनव लाँचिंग करण्यात आले. याला ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावरून ठाण्याच्या नागरिकाचे राहणीमानात अमुलाग्रह बदल झाल्याचे दिसून आले.

कुठलाही महागडा अद्यावत मोबाईल फोनचे लाँचिंग हे मुंबईच्या फिनिक्स मॉल, पंचतारांकित हॉटेल्समध्ये करण्यात यायचे कारण अशा महागड्या फोनला मुंबईतच ग्राहक मिळतात असा गैरसमज मोबाईल कंपन्याचा होता. तो गैरसमज आज कोरम मॉल मधील “ऍपल एस-6″ आणि “ऍपल एस-6 प्लस ” च्या लाँचिंगने दूर केला. रात्री 12 वाजता कोरम मॉलच्या श्रीजी फोन्स या शोरूम मध्ये “ऍपल एस6″ आणि “ऍपल एस6 प्लस ” घेण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली. त्यामुळे अशा फोनला मुंबईतच नव्हे तर ठाण्यात ही ग्राहक आहे याची अनुभूती आली.

ठाण्यातील वाढते नागरीकरण दळणवळणाची सुविधा आणि अनेक मॉल्स, सिनेमा घरे, उड्डाणपूले यामुळे ठाणे शहर हे मेगासिटी म्हणून मुंबईच्या बरोबरीने गणले जात आहे. “ऍपल एस6″ आणि “ऍपल एस6 प्लस” घेण्यासाठी मध्यरात्री ग्राहक मिळतो. यावरून ठाण्यातील नागरिकाच्या राहणीमानात बदल झाला याची प्रचीती येते. अद्यावत मोबाईल्स घेण्यासाठी आलेल्या महिला आणि पुरुष ग्राहकांना विचारले असता ते म्हणाले की पूर्वी नव्या कुठल्याची मोबाईलसाठी मुंबईकडे धाव घ्यावी लागत होती. पण आज मुंबईत मिळणार्‍या सर्वच वस्तू ठाण्यातच मिळत असल्याने आता होणारी दमछाक टाळली आहे अशा प्रतिक्रिया ग्राहकांनी व्यक्त केल्या.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close