शरद पवार हे न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान, राहुल बजाज यांची स्तुतीसुमनं

October 17, 2015 6:07 PM0 commentsViews:

17 ऑक्टोबर : शरद पवार हे न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान आहे अशी स्तुतीसुमनं उद्योगपती राहुल बजाज यांनी उधळली. ते बारामतीत बोलत होते.

कुणी काहीही म्हणो उद्योग असो, राजकारण असो काही टीका टीप्पणी होतच राहते. पण, शरद पवार हे माझे चांगले मित्र राहिले आहे. त्यामुळे ते न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान असेच आहे असंही राहुल बजाज म्हणाले.rahul bajaj on pawar

आज बारामतीत इंजिनिअरिंग कॉलेजच्या इमारतीचा नामकरण सोहळा पार पडला. या इमारतीला कमलनयन बजाज याचं नाव देण्यात आलंय. यावेळी राहुल बजाज यांनी पवारांचं तोंडभरून कौतुक केलं. या कार्यक्रमात राहुल बजाज यांनी पवारांचं तोंडभरून कौतुक केलं. यावेळी व्यासपीठावर शरद पवार, अर्थमंत्री अरुण जेटली उपस्थित होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close