मराठी माणसाच्या वाट्याला जाऊ नका – बाळासाहेबांचा अंबानींना इशारा

January 29, 2010 12:37 PM0 commentsViews: 2

29 जानेवारी मुकेश अंबानी यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून तोफ डागली आहे . मुकेश अंबानींचा रिलायन्सवर जितका हक्क आहे, तितकाच मराठी माणसांचा मुंबईवर आहे. पुन्हा मुंबई आणि मराठी माणसाच्या वाट्याला जाऊ नका, असा दमही बाळासाहेबांनी सामनातून अंबानींना दिला आहे. मुंबईवर सर्व भारतीयांचा हक्क आहे, असं विधान दोनच दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांनी लंडनमध्ये केलं होतं. तसंच अंबानी यांच्यासह इतर व्यावसायिकांनी मुंबई आणि मराठी माणसांच्या वाट्याला जाऊ नये असा इशाराही सामनात देण्यात आला.

close