नागपुरात माथेफिरु पतीने पत्नी आणि भाच्याचा केला निर्घृण खून

October 17, 2015 8:33 PM0 commentsViews:

nagpur murder17 ऑक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूर आता दिवसेंदिवस गुन्हेगारीचं शहर बनत चाललंय. शहरात आज दुपारी एका माथेफिरु पतीने आपल्या पत्नीचा आणि भाच्याचा कुर्‍हाडीने वार करून खून केल्याची घटना घडलीय.

साठ वर्षीय शरणु कांबळे नावाच्या या नराधमाने आपली पत्नी गोपीबाई कांबळे आणि 9 वर्षांच्या भाचा चेतन रामपुरे या दोघांवर कुर्‍हाडीने अतंत्य अमानुषपणे हल्ला केला. यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

या खुनामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये, पण पैशावरून पत्नीसोबत झालेल्या वादावरून हे खून झाले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close