भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार

January 29, 2010 12:40 PM0 commentsViews: 5

29 जानेवारी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचं नाव भाजपच्या प्रदेश अध्यक्षपदी निश्चित झाल्याचं समजतं. पुढच्या महिन्यात इंदौर इथे होणार्‍या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मुनंगटीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. मुनगंटीवार चंद्रपूरमधल्या बल्लारपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर भाजपचं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद रिकामं झालंय. या पदावर विदर्भातल्याच व्यक्तीची नियुक्ती व्हावी अशी गडकरींची इच्छा आहे. मुनगंटीवार चंद्रपूरमधून सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत. यावेळी चंद्रपूर मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांनी जिल्ह्यातल्या बल्लारपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. युतीसरकारमध्ये त्यांनी मंत्रीपद भूषवलं आहे. गडकरींच्या जवळचे आमदार म्हणूनही ते ओळखले जातात. या पदासाठी आमदार प्रकाश शेंडगे आणि सरचिटणीस विनोद तावडे हे नेतेही स्पर्धेत असल्याचं बोललं जातंय.

close