रॅगिंग रोखण्यासाठी राज्यसरकार नेमणार उच्चस्तरीय समिती

January 29, 2010 12:41 PM0 commentsViews: 4

29 जानेवारी रॅगिंगला आळा घालण्यासाठी राज्य सरकार एक उच्चस्तरीय समिती स्थापन करणार आहे. या समितीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत राज्यपालही असणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असल्याची माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ऍडमिशन घेतानाच रॅगिंगमध्ये सहभागी होणार नाही, असं विद्यार्थ्यांकडून लिहून घेण्याचंही या प्रस्तावात मांडण्यात आलं आहे. त्यासाठी 100 रुपयांच्या बाँडपेपरवर लिहून घेतलं जाणार आहे. याबाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची एकत्रित बैठक घेतली जाणार आहे.

close