पद्म पुरस्कार न मिळाल्याची खंत – मंगेश पाडगावकर

January 29, 2010 12:47 PM0 commentsViews: 3

29 जानेवारी जेष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी आपल्याला पद्म पुरस्कार न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये 22 व्या अखिल भारतीय मराठी बाल साहित्य संमेलनासाठी आले असता ते बोलत होते. आपल्याला आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत, मला पुरस्कारांचा हव्यास नाही, पण पद्म पुरस्कार न मिळाल्याची खंत असल्याचं ते म्हणाले. पद्म पुरस्कार जाहिर झाल्यावरुन सध्या वाद सुरु आहेत.

close