सादरे यांच्या पत्नीने केलेले आरोप चुकीचे – खडसे

October 18, 2015 12:20 PM0 commentsViews:

Eknath khasse

18 ऑक्टोबर : वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेले पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या कुटूबियांनी आता महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. अशोक सादरे यांना आपण मागच्या वर्ष-दीड वर्षापासून भेटलो देखील नव्हतो त्यामुळे या प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध असून सादर यांच्या पत्नीने आपल्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. त्याच बरोबर शासनाने या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी आणि काही तथ्य आढळल्यास दोषींवर कारवाई करावी, असं स्पष्टीकरण महसूल आणि कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी काल (शनिवारी) पत्रकारांशी बोलताना दिले.

नाशिकमध्ये दोन दिवसांपूर्वी जळगावचे पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी आत्महत्या केली होती. ज्या वाळू ठेकेदाराच्या जाचाला कंटाळून सादरे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तो ठेकेदार एकनाथ खडसे यांच्या जवळचा माणूस असल्याचंही कुटुंबीयांचं म्हणणं आहे. पण सादरे यांच्या मृत्यूशी माझा कुठलाही संबंध नाही, असं खडसे यांनी म्हटलंय.

इतकंच नाही तर सादरे यांची कारकिर्दच समाधानकारक नाही, असा आरोप खडसेंनी केला. सादरे यांनी बोदवड, जळगाव, नवी मुंबई इथल्या कार्यरत असताना वरिष्ठांशी गैरवर्तन केलं. त्यामुळे सादरे यांच्या निलंबनासाठी आपण दबाव आणला नाही. तसंच सादरे यांच्या पत्नीला मी ओळखतही नाही, असंही खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close