जुन्नरमध्ये रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान बिबट्याचा वनविभागाचा कर्मचार्‍यावर हल्ला

October 18, 2015 1:35 PM0 commentsViews:

18 ऑक्टोबर : आंबेगाव आणि जुन्नर परिसरात विहिरीत पडलेला बिबट्या वनविभागाकडून जेरबंद केल्याच्या बातम्या आपण नेहमीच पाहत असतो. पण जुन्नर तालुक्यातील बेल्हा अळकुट इथं एक बिबट्या दोन वेळा विहीर पडला आणि गावकर्‍यांना पुन्हा एकदा बिबट्याचा थरार पाहायला मिळाला.

काल रात्री बिबट्या शेळीचा पाठलाग करत असताना भाऊसाहेब थोरात यांच्या विहिरीत पडला. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वन विभाग कर्मचार्‍यांनी सापळा रचला. अथक प्रयत्नानंतर वनकर्मचार्‍यांनी बिबट्याला सुखरूप बाहेर काढलं पण बिबट्या पिंजर्‍यात अडकलाच नाही. त्याने वनकर्मचारी एस.एम. चव्हाण यांच्यावर हल्ला केला आणि त्यानंतर बिबट्या रामदास थोरात यांच्या विहिरीत पडला. या हल्ल्यात चव्हाण जखमी झाले. दरम्यान, जुन्नर वन विभागाचे कर्मचारी आणि माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रातील डॉ. अजय देशमुख रेस्क्यू टीमनं बिबट्याची त्या विहिरीतूनही सुटका केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close