होंडा सिटी अपघातात दोघांचा मृत्यू

January 30, 2010 9:19 AM0 commentsViews: 2

30 जानेवारी मरीन लाईन्सवर झालेल्या अपघातात पीएसआय दिनानाथ शिंदे यांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री मरीन लाईन्सवर नुरिया अहलुवालिया या नशेबाज महिलेने तिच्या होंडा सिटी गाडीने पाच पोलिसांना आणि एका नागरिकाला उडवलं. या घटनेत एका नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. तर पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहेत. रात्री साडेबाराच्या सुमारास मरीन लाईन्स भागात ही घटना घडली. नुरिया मुखमोजीया ही महिला दारूच्या नशेत ही गाडी चालवत होती. घटनास्थळी मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव अफजल मुखमोजीया असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या महीलेला अटक करण्यात आली आहे. तिला शनिवारी दुपारी मुंबईच्या किल्ला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आर.आर. पाटील यांनी शनिवारी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली.

close