96 व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गंगाराम गवाणकर यांची निवड

October 18, 2015 4:05 PM0 commentsViews:

3518 ऑक्टोबर : 96 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

‘वस्त्रहरण’ या गाजलेल्या नाटकाचं लेखन गवाणकर यांनी केलं आहे. ‘वस्त्रहरण’नंतर गवाणकरांनी ‘दोघी’, ‘वन रूम किचन’, ‘वात्रट मेले’ यांसारख्या नाटकं त्यांनी लिहिली आहेत. मालवणी भाषेला रंगमंचावर आणण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे. गवाणकर यांच्या निवडीबद्दल नाटय़-सिने क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याआधी बेळगावमध्ये झालेल्या 95 व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद फैयाज शेख यांनी भूषवलं होतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close