एक फेब्रुवारीपासून दूध 2 रुपयांनी महागणार

January 30, 2010 9:24 AM0 commentsViews: 7

30 जानेवारी 1 फेब्रुवारीपासून दूधविक्रीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय गोकूळ दूध संघाने घेतला आहे. म्हशीच्या दुधात 2 रुपयाने वाढ केली जाणार आहे. त्यामुळे दुधाचे भाव 30 रुपये लिटरवरून 32 रुपयांवर जाणार आहेत. तर गायीचं दूधही 1 रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे गायीच्या दुधासाठी लिटरला 25 रु मोजावे लागणार आहेत. गोकुळ संघाने दूधवाढ जाहीर करताच वारणा आणि कृष्णा दूध संघांनीही दूध विक्रीदरात एक तारखेपासून दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इतर वस्तूंबरोबरच दूधाच्या दरातही वाढ झाल्याने ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे.

close