19चा वर्ल्डकप ऑस्ट्रेलियाने जिंकला

January 30, 2010 9:25 AM0 commentsViews: 1

30 जानेवारी अंडर 19चा क्रिकेट वर्ल्डकप ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. त्यांनी फायनलमध्ये पाकिस्तानचा 25 रन्सनी पराभव केला. बॉलर्सना साथ देणार्‍या पिच व पाकिस्तानने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला पहिली बॅटिंग दिली. फयाज बट्ट आणि सरमद भट्टी यांच्या शानदार बॉलिंगमुळे ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर झटपट आऊट झाली. मात्र तळाच्या बॅट्समननी नेटाने बॅटिंग केल्याने ऑस्ट्रेलियाने निदान दोनशेचा टप्पा ओलांडला आणि पन्नास ओव्हर्समध्ये नऊ विकेटवर 207 रन्स केले. रिचर्डसनने सर्वाधिक 44 रन्स केले. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने सुरुवात चांगली केली होती. एकावेळी टीमचा स्कोअर तीन विकेटवर 110 रन्स होते. पण तिसाव्या ओव्हरमध्ये रमीझ अजिज आऊट झाला आणि मॅच फिरली. पाकच्या पुढच्या विकेट्स झटपट गेल्या आणि 182 रन्समध्ये त्यांची टीम ऑल आऊट झाली.

close