अबब…नागपुरात तब्बल 40 लाखांची तूरडाळ चोरीला

October 19, 2015 6:46 PM0 commentsViews:

nagpur turdal19 ऑक्टोबर : तुरीच्या डाळीच्या किमती सध्या चांगल्याच वाढल्यात आणि अशातच परदेशातून नागपूरमध्ये आयात केलेली 40 लाखांची तूर चक्क चोरीला गेलीये. तूरडाळ मिलमध्ये ही तूर आणण्यात आली होती. ज्या ट्रकमधून आणण्यात आली होती, त्या ट्रक ड्रायव्हरनंच ही डाळ लंपास केलीये.

तुरीच्या डाळीच्या किमती गगनाला पोहचल्या असल्यामुळे परदेशातून आयात केलेली 40 लाखांची तुर ट्रक ड्रायव्हर्सनी चोरल्याची घटना नागपुरात घडली आहे. मुंबईतून नागपुरात तुरीच्या डाळीसाठी दाल मिलमध्ये तूर आणली जाते. पण वाटेत ट्रक ड्रायव्हर्सनी आपल्या ट्रकमध्ये केलेल्या कंपार्टमेंटसमध्ये लपवलेल्या मातीतून ही चोरी करत होते. या प्रकरणात एका ट्रक ड्रायव्हरला ट्रकसह अटक करण्यात
आली आहे तर दोन ट्रक चालकांनी ट्रक सोडून पळ काढलाय . यासंदर्भात कळमना पोलीस अधिक तपास करीत आहेत. याआधी कांद्याचे भाव गगनाला भिडले होते तेव्हा कांदा चोरीच्या घटना घडल्या होत्या.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close