जम्मू-काश्मीरमधील अपक्ष आमदार इंजिनियर रशीद यांच्यावर शाईफेक

October 19, 2015 7:26 PM0 commentsViews:

EngineerRashid19 ऑक्टोबर : जम्मू आणि काश्मीरमधले अपक्ष आमदार इंजिनियर रशीद यांच्यावर शाईफेक करण्यात आलीये. दिल्लीत पत्रकार परिषद सुरू असताना दोन अज्ञात व्यक्तीने शाई फेकली. पोलिसांनी या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.

गेल्या काही दिवसांत देशभरात अनेक ठिकाणी बीफ खाल्ल्यावरून किंवा खाल्ल्याच्या संशयावरून हिंसेच्या घटना घडत आहेत. दादरीमध्ये गोमांस असल्याच्या संशयावरुन जमावाने अखलाक याला मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच इंजिनियर रशीद यांनी श्रीनगरमध्ये बीफ पार्टी दिली होती. बीफ पार्टी दिल्यावरून भाजप आमदांरानी रशीद यांना मारहाण केली होती. आज रशीद यांना पुन्हा एकदा टार्गेट करण्यात आलं. भर पत्रकार परिषदे त्यांच्यावर बकेटभरून शाई फेकण्यात आली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close